Pune Traffic : वाकड-दत्तमंदिर रस्त्यावर चार तास वाहतूक कोंडी

विकेंड असल्याने चारच्या सुमारास रहिवाशी खरेदीसाठी नेहमी प्रमाणे बाहेर पडले.
Pune Traffic
Pune Trafficsakal

Pune Traffic - वाकड- दत्त मंदिर रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम, जागोजागी खोदून ठेवलेले रस्ते आणि त्यातच वाटेल तशी रस्त्यातच वाहने पार्क करणारी बेशिस्त मंडळी यामुळे विकेंड आला की वाकडच्या रस्त्यावर जणू वाहनांचा पूर येतो. रविवारी (ता. १५) सायंकाळी पुन्हा हीच परिस्थिती ओढावली तब्बल चार तासाहून अधिक काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम होती त्यामुळे अनेकांना रस्त्यात अडकून पडावे लागले होते.

विकेंड असल्याने चारच्या सुमारास रहिवाशी खरेदीसाठी नेहमी प्रमाणे बाहेर पडले. दत्त मंदिर रस्त्याचे काँक्रीटीकारणाचे काम सुरू आहे त्यामुळे रस्ता निमुळता झाला आहे त्यात असंख्य मोटारी रस्त्यावरच पार्क होत्या, विक्रेत्यांनी देखील रस्त्यावर

बस्तान मांडलेले तर येथील स्टार बाझार, झुडिओ या शॉप समोरील मोठ्या बेशिस्त पार्किंगने रस्ता व्यापला होता त्यामुळे चार तासाहून अधिक वेळ जाम झाला होता. जानोबा चौक, उत्कर्ष चौक वाकड चौक इत्यादी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र तरीही या मार्गात कुठेही वाहतूक पोलीस दिलसे नाहीत शनिवारी-रविवारी दोन दिवस अतिरिक्त पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.

Pune Traffic
Mumbai : मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्यातील काही भागात आले धुळीचे वादळ

विकेंडला वाकडकरांच्या उरात भरते धडकी

शिनिवार-रविवार हे विकेंडचे दोन दिवस सर्वांच्याच आवडीचे. आरामाचे, रिलॅक्स मूडचे, मनसोक्त फिरण्या बागडण्याचे आणि खरेदीचे. मात्र हेच दोन दिवस आता वाकडकरांच्या उरात धडकी भरवत आहेत. याचे कारण म्हणजे विकेंडला वाकडमधील अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी समस्या होय.

चौका-चौकात थाटलेल्या खाऊ गल्ली, चौपट्या, पथारी व्यावसायिकांचे बस्तान, रस्त्यांवर आठवडे बाजारांची जणू लागलेली शर्यत, विविध वस्तू, खेळणी, साहित्य विक्री करणाऱ्या स्टोलची गर्दी त्यासाठी रस्त्यांवरच बेकायदेशीर होणारी पार्किंग हे या वाहतूक खोळंब्याचे प्रमुख कारण बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com