#PuneTraffic ‘ट्रॅफिक जॅम’ने पुणेकर जाम

#PuneTraffic ‘ट्रॅफिक जॅम’ने पुणेकर जाम

पुणे -  तुम्हाला सकाळी ऑफिसला जायचे आहे, तर एक ते दीड तास अगोदरच निघा. कारण, तुम्ही शहरात येत असाल किंवा शहराबाहेर जात असाल, तर तुम्ही वाहतूक कोंडीमध्ये शंभर टक्के अडकणारच. त्यातून मार्ग काढताना तुमचा एक ते दीड तास जाणार म्हणजे जाणारच. घरी जाताना पुन्हा तीच तारेवरची कसरत...याचीच पुनरावृत्ती सोमवारी पुणेकरांनी अनुभवली. 

गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे एक दिवस संपूर्ण शहर कोंडीत अडकले होते. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला होता. त्या घटनेपासून वाहतूक पोलिस किंवा महापालिका प्रशासन बोध घेऊन या वेळी सुधारणा करेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती; मात्र त्या अपेक्षेचे सोमवारच्या पुनरावृत्तीने चिंधड्या उडाल्या. गेल्या सोमवारी आणि पुन्हा आजही शहर कोंडीत अडकले. 

रोज वाहतूक कोंडीमध्ये पुणेकरांचे कित्येक तास वाया जात असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे, तर पोलिस प्रशासन उपलब्ध मनुष्यबळावर जमेल तसे वाहतुकीचे नियमन करत असल्याची सद्य-स्थिती आहे. एकूणच पुणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे अद्याप दिसेनात. 

ट्‌विटला ‘नो रिप्लाय’
शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी नागरिकांनी पोलिस, महापालिका प्रशासनाबरोबरच आपापल्या भागातील आमदार किंवा खासदार गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना फेसबुक, ट्‌विटरद्वारे संपर्क साधला. मात्र, एकानेही नागरिकांच्या प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. विशेषत- अन्य राजकीय पक्षदेखील शहरातील वाहतूक कोंडीवर मूग गिळून गप्प बसल्याची सद्य-स्थिती आहे.

वाहतूक कोंडीचे आगार 
  पुणे विद्यापीठ चौक - गणेशखिंड रस्ता, औंध, बाणेर, पाषाण   
  जंगली महाराज रस्ता - शिवाजीनगरहून येणारे व अंतर्गत रस्ते 
  कोथरूड-कर्वे रस्ता - येताना व जाताना   
  कात्रज-हिंजवडी बाह्यवळण - कात्रज, वडगाव, धायरी, वारजे, चांदणी चौक, पाषाण, सुतारवाडी, हिंजवडी 
  सिंहगड रस्ता - दांडेकर पूल ते वडगाव उड्डाण पूल 
  सातारा रस्ता - कात्रजहून स्वारगेटला येताना व जाताना 
  नगर रस्ता - येरवड्यापासून वाघोलीपर्यंत  
  पुणे- सोलापूर रस्ता - हडपसर, पुलगेट  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com