पुणे : टेम्पो अडकल्याने नदीपात्रातील वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पुणे : डेक्कन नदीपात्रातील पुलाच्या कमानी जवळ टेम्पो अडकल्याने आज (ता.10 ) सकाळी वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता बंद झाल्याने रजपूत झोपडपट्टीकडून डेक्कनच्या बाजूला जाणाऱ्या दुचाकी वाहनांना मागे फिरावे लागले. मागे फिरणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली.

पर्यायी रस्ता म्हणून नदीपात्रातून संजीवनी हाॅस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाणारे वाहनचालक सुध्दा तेथील रस्ता बंद असल्याने मागे फिरले. रजपूत झोपडपट्टी,  कलिंगा हाॅटेल गल्ली, सिंहगड इन्स्टिट्यूट रस्ता येथे बराच काळ वाहतूक कोंडी झाली. नेमकं काय झालं आहे हे समजत नसल्याने वाहनचालक वैतागले होते. 

Web Title: Pune : The traffic jam in the riverbank due to tempo stuck on road