Pune : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर उचलून नेलं!

ही घटना मुंढवा रोड- खराडी बायपास रोडवर शुक्रवारी घडली.
pune traffic police
pune traffic policesakal media

मुंढवा : पुणे - वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर लटकवत तब्बल ८०० फुट फरफटत नेण्यात आले. ही घटना मुंढवा रोड- खराडी बायपास रोडवर शुक्रवारी घडली. कार मालकाला त्याच्यावर असलेला ४०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत श्रीधर कांतावर (वय ४३, रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शेषराव मारूती जायभाय यांनी तक्रार दिली होती.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जायभाय हे सहायक पोलीस निरीक्षक सुरजकुमार राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा महात्मा फुले चौकामध्ये हनांच्यावा पुर्वीच्या ऑनलाईन खटल्यांच्या दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई करत होते. यावेळी प्रशांत कांतावार हे आय २० ही कार घेऊन आले. त्यांना थांबवण्यात आले असता, त्यांना पुर्वीची ४०० रुपये दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले.

यावेळी त्याने जोरजोरात हॉर्न वाजवत 'एक भी पोलीस ढंग का नही, पैसे कमाने के लिए खडे हो क्‍या? असे म्हणत गाडी दामटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जायभाय यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ते गाडीच्या बोनेटवर ढकलले गेले. ते गाडीच्या बोनेटवर लटकत असतांना सुध्दा८०० मीटर अंतरावर घेऊन गेले. यात जायभाय यांच्या हाताच्या बोटास व कोपरास दुखापत झाली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com