पुणे : वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार; गुन्हा केला एकाने दंड मात्र दुसऱ्यालाच

पुणे : वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार; गुन्हा केला एकाने दंड मात्र दुसऱ्यालाच

पुणे: शहरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यावर देखरेख ठेवली जाते. वाहतूकीचे नियम तोडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्यास वाहतूकीचे नियम भंग करणाऱ्यावर कारवाई करण्यात येते. ई-चलनच्या माध्यमातून गाडीचा क्रमांक पाहून त्या गाडीवर दंड आकारण्यात येतो. मात्र, यामध्ये पुणे वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला असून गुन्हा एकाने केला असून दंड मात्र दुसऱ्यालाच आकारल्याच्या घटना घडल्या आहेत.

ज्यांनी गुन्हा केला नाही त्यांनाच दंड भरावा लागत असल्याने नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. पुण्यातील एक घटना पाहिल्यास MH 12 NS 6151  या गाडीच्या मालकांवर विनाहेल्मेटचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, पुराव्यादाखल सीसीटीव्हीतील फुटेजचा फोटो पाहिल्यास तो दुसऱ्याच कोणाचातरी असल्याचे दिसत आहे. या फोटो मध्ये दिसणाऱ्या गाडीचा क्रमांक हा MH 12  NS 1651 असा आहे. म्हणजेच, MH 12  NS 1651 या गाडीच्या मालकाने नियमांचे उल्लघंन केले आहे आणि दंड मात्र MH 12 NS 6151 या गाडीच्या मालकांवर पडलेला दिसत आहे. विनाहेल्मेटचा एकूण 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

पुणे वाहतूक पोलिसांचा हा भोंगळ कारभार असून नियम पाळणाऱ्या नागरिकांनाही विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com