पार्किंग पाॅलिसीसाठी होणार पाच रस्त्यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : नव्या पार्किंग पॉलिसीअंतर्गत प्रमुख पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर 'पे अँड पार्क' योजना राबविण्याचा निर्णय झाला, तरी वाहतूक पोलिसांचा अभिप्राय घेऊन या रस्त्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ, स्वरूप, बाजारपेठा इत्यादींचा अभ्यास करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पुढील महिनाभरात होण्याची शक्‍यता आहे. 

नियोजित पार्किंग धोरणाला मंजुरी देताना पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांवर योजना राबविणे, रात्रीच्या वेळी पार्किंग शुल्क न आकारणे आणि धोरणाच्या कामकाजासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती नेमण्याची उपसूचना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाली. मात्र, या धोरणाला विरोध करीत समितीत काम न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेने घेतला आहे.

या पार्श्‍वभूमीवर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यात येणार आहेत. त्यात पाच रस्त्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भात महापालिका आणि वाहतूक पोलिसांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यात कोणत्या पाच रस्त्यांवर ही योजना राबविणे सोयीचे होईल, याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर दोन्ही यंत्रणांचे अधिकारी पाहणी करून या रस्त्यांची निवड करणार आहेत. 

या धोरणाच्या अंमलबजावणीत बदल झाल्याने सुधारित प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्यासाठी वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल; तसेच महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीची रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार कामांची विभागणी करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल. या कामासाठी पुणेकरांशी संवाद ठेवला जाणार असून, त्यांच्या सूचनांचाही विचार करण्यात येईल. 
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका

Web Title: Pune Traffic Police to help PMC to choose five road where Parking Policy will be implemented