Traffic Police : वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक नियमनावर भर द्यावा - विजयकुमार मगर

पुणे पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने ‘कोणे हा माठ’ वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
Vijaykumar Magar
Vijaykumar Magarsakal

पुणे - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई झाली पाहिजे. परंतु केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. या संदर्भात शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पुणे पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने ‘कोणे हा माठ’ वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास ‘सकाळ’ माध्यम समूहाचे सहकार्य लाभले आहे. या अभियानास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनाबाबत मंगळवारी (ता. २१) वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त मौला सय्यद यांच्यासह वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक उपस्थित होते. यापुढील कालावधीत वाहतूक जनजागृती अभियानाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

पोलिस उपायुक्त मगर म्हणाले, वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना नियमांची माहिती व्हावी, यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. त्यासाठी प्रत्येक वाहतूक विभागाकडून विशेष पथके तयार करावीत. भरधाव वाहने चालवून स्वत: आणि दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

Vijaykumar Magar
Water Supply Close : पुणे शहरातील दक्षिण भाग वगळता इतर सर्व भागात गुरुवारी पाणी बंद

शहरात लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच, सध्या काही ठिकाणी मेट्रो आणि इतर विकासकामे सुरू आहेत. परिणामी रस्ते अरुंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महापालिका, पीएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी चर्चा करण्यात येत आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्वयंसेवी संस्था, संघटना, महाविद्यालयीन तरुण आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे, असे वडापोलिस उपायुक्त मगर यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com