#PuneTraffic बेशिस्त वाहनचालकांना लगाम

Pune-Traffic
Pune-Traffic

पुणे - शहर आणि उपनगरातील वर्दळीच्या चौकांत आणि गर्दीच्या वेळात ‘नो व्हायलेशन झोन’ची अंमलबजावणी वाहतूक पोलिस पुढील आठवड्यापासून करणार आहेत. महापालिका, वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी संयुक्तपणे केलेल्या आराखड्यानुसार प्रामुख्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होणार आहे. 

शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी वाहतूक पोलिस, महापालिका, आरटीओ, रेल्वे, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त एम. वेंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली एका आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करून वाहतुकीशी पूरक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध घटकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.

नो पार्किंग तसेच पदपथांवर उभी केलेली वाहने उचलण्यासाठी पोलिसांकडे पुरेशा संख्येने क्रेन आणि टेंपो नाहीत. यामुळे ५० क्रेन आणि ५० टेंपो उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. त्याची दखल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतली. पहिल्या टप्प्यात येत्या दोन दिवसांत महापालिका पाच क्रेन आणि पाच टेंपो उपलब्ध करून देणार आहे. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

वाहने आणि पादचाऱ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या चौकांतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यासाठीचा आराखडा अतिक्रमण निर्मूलन विभागाने निश्‍चित केला आहे. चौक अतिक्रमणमुक्त केल्यास वाहतूक काही प्रमाणात तरी सुरळीत होऊ शकेल. 
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग

अशा होणार उपाययोजना
    शहरातील १०० चौकांवर लक्ष
    शहरातील ५० चौकांतील अतिक्रमणे महापालिका काढणार 
    रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवरील विजेचे खांब हलविणार 
    सर्वाधिक वाहतुकीच्या चौकांत १०-१५ पोलिसांचे पथक
    पदपथावर चारचाकी वाहने लावणाऱ्यांवर कडक कारवाई

याबाबत होणार कारवाई
    पासिंग नसलेली वाहने, अवैध प्रवासी वाहतूक
    सीट बेल्ट न लावता वाहन चालविणे
    दुचाकीवर ट्रिपल सीट जाणे
    मोबाईलवर बोलत वाहने चालविणे
    वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे
    बेशिस्तपणे वाहने चालविणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com