पुण्याची ‘तुळशीबाग’ आता बनली लोकल ते ग्लोबल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

तब्बल अडीचशे वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी आणि पुण्यात आल्यानंतर या बाजारात खरेदी करण्याचा मोह टाळता न येणारी ‘तुळशीबाग’ आता लोकल ते ग्लोबल बनली आहे. ‘सकाळ’ आणि ‘बल्ब अँड की’ यांनी स्थानिक व्यवसायांना ग्लोबल बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तयार केलेल्या ‘३km’ या ॲप्लिकेशनशी आता तुळशीबाग जोडली गेली आहे.

पुणे - तब्बल अडीचशे वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी आणि पुण्यात आल्यानंतर या बाजारात खरेदी करण्याचा मोह टाळता न येणारी ‘तुळशीबाग’ आता लोकल ते ग्लोबल बनली आहे. ‘सकाळ’ आणि ‘बल्ब अँड की’ यांनी स्थानिक व्यवसायांना ग्लोबल बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तयार केलेल्या ‘३km’ या ॲप्लिकेशनशी आता तुळशीबाग जोडली गेली आहे. त्यामुळे पुण्याचे खास वैशिष्ट्य म्हणून जगभरात ओळख असणारा तुळशीबाग बझार आता एका क्‍लिकवर उपलब्ध झाला आहे.

Image may contain: text that says "KG/110馬制 अशी करा व्यवसाय नोंदणी असे आहेत ॲपचे प्रमुख फायदे व्यावसायिकांसाठी ॲप फायदेशीर आपला व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार वस्तू घरपोच देण्याची सोय उत्पादनांचे लिस्टिंग करता येईल स्वतःचा ब्रॅड तयार होणार जमा खर्च हिशेब ठेवता येईल दुकान व उत्पादनानुसार वस्तू ग्राहकांना शोधता येणार व्यवसायाचे व्यवस्थापन होणार सुलभ क्यूआर कोड स्कॅन करा आपली माहिती थोडक्यात भरा आमची टीम तुम्हाला मदतीसाठी संपर्क करेल ←"

हद्दीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश आला; 'नगरसेवक' होण्यासाठी इच्छुकांची जोरदार फिल्डिंग

कोरोना महामारीच्या संकटानंतर संपूर्ण जगात आमूलाग्र बदल झाला. व्यवसाय, बाजाराचे स्वरूप बदलले. ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड झपाट्याने वाढला. अशा वेळी स्थानिक छोट्या व्यावसायिकांना डिजिटल व्यासपीठ देण्यासाठी ‘सकाळ’ने व्यावसायिकांच्या आग्रहाखातर ‘३km’ ॲप्लिकेशन तयार केले आहे. डिजिटल व्यवसाय म्हणजे केवळ एक-दोन सोशल साइटवर आपली प्रसिद्धी करणे, असे नाही. तर त्यासाठी लागणारी संपूर्ण अनुकूल व्यवस्था उभी करणे हे ‘३km’चे उद्दिष्ट असून, तशीच यंत्रणा उभी करण्यात आली आहे. डिजिटल व्यवसाय सुरू केल्यानंतर वस्तूंची डिलिव्हरी कशी करायची, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न या ॲपमधून मार्गी लागणार आहे. त्यामुळेच या ॲपला व्यावसायिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला असून, मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. तुळशीबाग हा त्यात सर्वांत महत्त्वाचा घटक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पेशवाईच्या काळापासून पुण्याचे खास आकर्षण बनलेल्या तुळशीबागेने आता आधुनिकतेची कास धरली आहे. जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला हा बाजार म्हणजे ‘पिन टू पियानो’ याचाच अर्थ सर्वकाही वस्तू त्याही अगदी बजेटमध्ये मिळणारे पुण्यातील एकमेव ठिकाण. देवपूजेला लागणाऱ्या सहाण-खोडे, फुले अशा वस्तूंपासून सुरवात झालेल्या या बाजारात काय मिळत नाही, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळेच महिलावर्गासाठी तुळशीबाग हा आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. ही अख्खी तुळशीबाग आता ‘३km’ ॲपवर उपलब्ध झाली असून, तुम्ही घरबसल्या या बाजारातील कोणतीही वस्तू एका क्‍लिकवर खरेदी करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप (३km) उपलब्ध आहे.

'मराठा क्रांती मोर्चा'ने राज्य सरकारच्या अध्यादेशाची केली होळी!

‘सकाळ’ची विश्‍वासार्हता मोठी आहे. व्यावसायिकांनी तयार केलेले हे ॲप तुळशीबागेतील आम्हा व्यावसायिकांना निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे. कोरोनानंतर ई कॉमर्सचे मार्केट २६ टक्‍क्‍यांवर पोचले आहे. सर्वसामान्य लोकही आता खरेदीसाठी ॲपचा वापर करतात. त्यामुळे आमच्यासाठी ही मोठी सुविधा तयार झाली आहे. ग्राहकांना घरबसल्या तुळशीबागेतील माल खरेदी करता येईल. याचा आम्हा व्यावसायिकांनाही नक्कीच फायदा होईल.
- नितीन पंडित, अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Tulshibag Global Sakal 3km Application