पुणे : तुषार हंबीर हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arres

पुणे : तुषार हंबीर हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक

पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार (मोका) कारवाई झालेला व ससून रूग्णालयात उपचार घेणारा आरोपी तुषार हंबीर याच्यावर खुन हल्ला करण्याच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने उत्तमनगर परिसरात हि कारवाई केली.

प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर (वय 26, रा.भीमनगर, उत्तमनगर), परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय 21, रा. ऊरळी-देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर तुषार नामदेवराव हंबीर (वय 35, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू राष्ट्र सेनेच्या हंबीर याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. त्याच प्रकरणामध्ये त्याच्याविरुद्ध "मोका'नुसार कारवाई देखील करण्यात आली होती.

त्यास अटक केल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. दरम्यान, हंबीर यास चालता येत नसल्याने त्यास उपचारांसाठी 25 ऑगस्ट रोजी कारागृहातुन हलवून ससून रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, 5 सप्टेंबरला टोळक्‍याने ससून रूग्णालयात शिरून हंबीर याच्या खुनाचा प्रयत्न केला. मात्र तेथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यामुळे हा हल्ला परतवुन लावण्यात आला होता.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. तर मुख्य सुत्रधार असलेला दिवाकर व इनामदार हे दोघे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान, दोन्ही आरोपी हे उत्तमनगर परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने त्या दोघांना सापळा रचून अटक केली. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, दयाराम शेगर यांच्या पथकाने केली.

Web Title: Pune Tushar Hambir Attack Case Two Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..