पुणे : तब्बल बारा तास पौड फाटा उड्डाणपुल बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कोथरूड : मेट्रो प्रकल्पाच्या कामामध्ये रस्त्यावर क्रेन बंद पडल्याने मंगळवारी रात्रीपासून पौड फाटा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता क्रेन बाजूला घेऊन रस्ता वाहतूकीसाठी खुला केला. दरम्यान रस्ता बंद झाल्याने सकाळी पौड फाटा परिसरात वाहतुक कोंडी झाली होती.

मंगळवारी रात्री एकच्या सुमारास जॅकसाठी वापरण्यात येणारी क्रेन अचानक नादुरुस्त झाली. ही क्रेन रस्त्यामध्येच उभी असल्याने सुरक्षीततेचा उपाय म्हणून नळस्टॉप चौकाकडून पौड फाटा उड्डाणपुला मार्गे चांदनी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करुन कर्वे रस्त्याने वळविण्यात आली होती.

‎कर्वे रस्त्याने पौड रस्त्याला जाणारा एकमेव रस्ता असलेला पौड फाटा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद झाल्याने बुधवारी सकाळी कर्वे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पौड रस्त्याने मुळशी आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो प्रशासनाने अशा प्रकारे अचानक रस्ता बंद केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

‎याबाबतीत बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापक अतुल गाडगीळ म्हणाले, क्रेन नादुरुस्त झाल्याने रस्ता बंद करावा लागला होता. मात्र आज क्रेन बाजुला हटवुन रस्ता खुला करण्यात आला आहे.

Web Title: Pune: For twelve hours, the Paud Phata flyover is closed