Pune : दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, चार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, चार जखमी

वाघोली - दोन कार मध्ये समोरासमोर धडक होऊन एक जण मृत्युमुखी पडला तर चार जण जखमी झाले. ही घटना बकोरी- केसनंद रोडवर जोगेश्वरी मंदिरासमोर शुक्रवारी रात्रीं आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

मयुर भाऊसो बहिरट ( रा. केसनंद, ता. हवेली ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर योगेश केरदळे, सर्जेराव माने, किरण गावडे व अजय जाधव हे जखमी झाले. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मयूर हा कार घेऊन केसनंद कडे जात होता.

तर चौघे जण पुण्याकडे येत होते. दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मयूर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या कारमधील चौघे जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अजय जाधव यांनी फिर्याद दिली.

तीन दिवसातील दुसरा अपघात

बुधवारी दुपारी वाघोलीत केसनंद फाट्यावर डंपरच्या धडकेने दुचाकीवरील काळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर शुक्रवारी रात्री या दोन कारचा अपघात होऊन एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले. अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांचा अति वेगच अपघाताला कारणीभूत ठरत आहे.