आता नवीन शैक्षणिक वर्षाचे कामकाज होणार ऑनलाईन; पुणे विद्यापीठातर्फे यंत्रणा विकसित 

Pune University Developed system to conduct the work of the new academic year online
Pune University Developed system to conduct the work of the new academic year online

पुणे : "ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि बॅण्डविड्थ यांची अडचण यापुढील काळात जाणवू शकते. या सर्वांचा विचार करून नवीन शैक्षणिक वर्षाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यासाठी विद्यापीठाने नवीन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कमी कनेक्टिव्हीटी असलेल्या भागांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होणार आहे," अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्व व्यावसायिक आणि अव्यावसायिक महाविद्यालयांमधील प्राचार्य आणि संचालक यांच्याकरिता व ऑनलाईन शिक्षण' विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. करमळकर यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ईएमआरसीचे संचालक डॉ. समीर सहस्त्रबुद्धे,  विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, ई कंटेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते. 

या ऑनलाईन वेबिनारमध्ये प्राचार्य / संचालक यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, "कोरोनामुळे आपण सर्व जण आता क्लासरूम टीचिंगवरून थेट ऑनलाईन शिक्षणाकडे आलो आहोत. आत्तापर्यंत जवळजवळ दीड ते दोन हजार तासांची माहिती या नवीन व्यासपीठावर अपलोड करण्यात आली आहे. या माध्यमातून दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. या ऑनलाईन यंत्रणेची निर्मिती विद्यापीठाची सेक्शन ८ कंपनी 'sppu एज्युटेक फाउंडेशन' मार्फत करण्यात आलेली आहे. या यंत्रणेची चाचणी यापूर्वी आपण विद्यापीठाशी संलग्नित १० महाविद्यालयांमध्ये केलेली असून आता आणखी दहा महाविद्यालयांमध्ये या यंत्रणेची चाचणी करणार आहोत. ही ऑनलाईन यंत्रणा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना मोफत उपलब्ध असणार आहे. ही नवीन ऑनलाईन यंत्रणा कशा पद्धतीने वापरावी याबद्दलच्या मार्गदर्शिका काही दिवसात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल."

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

यावेळी ईएमआरसीचे संचालक डॉ. समीर सहस्त्रबुद्धे यांनी  'ऑनलाईन शिक्षण' याविषयी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. या दरम्यान वेबिनार मध्ये सहभाग घेतलेल्या प्राचार्य / संचालक यांनी  'ऑनलाईन शिक्षण' याबद्दल त्यांना येणाऱ्या शंका, प्रश्न ऑनलाईनच्या माध्यमातून विचारले. आय. टी. कन्सल्टंट दीपक हर्डीकर यांनी नवीन ऑनलाईन यंत्रणेची माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या ५१० प्राचार्य आणि संचालक यांनी या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com