संशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी येत्या शुक्रवारी (ता. १४) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस) होणार आहे.

स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील (शहर वगळून) सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या विषयांवर आधारित संशोधनात्मक पोस्टर्सचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडे संशोधनात्मक पोस्टर्स पाठवण्यात आले. यातून काही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड केली आहे. या विद्यार्थ्यांचे पोस्टर्स शुक्रवारी होणाऱ्या फेरीमध्ये मांडण्यात येणार आहे. या स्पर्धेत मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी, पर्यावरणशास्त्र, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधी आणि वैद्यकीयशास्त्र अशा विषयांवर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचेही संशोधनात्मक पोस्टर्स प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

जिल्हास्तरीय फेरीतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना विद्यापीठस्तरीय आणि राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक डॉ. डी. जी. भालके यांनी दिली.

Web Title: Pune University Exam on Research