विद्यापीठात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल स्थापना करण्यात आली आहे. कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळिग्राम यांची नेमणूक केली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या कौन्सिलच्या स्थापनेला मान्यता दिली. नवी दिल्लीतील कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

विद्यापीठातील डिझाइन इनोव्हेशन सेंटर अंतर्गत ही परिषद असणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘डिझाईन थिंकिंग, इंटलेक्‍च्युअल प्रॉपर्टी राइट्‌स, बिझनेस प्लॅन डेव्हलपमेंट, आंत्रप्रेन्युअर डेव्हलपमेंट यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

‘आयआयसी’च्या कामाचे असे असेल स्वरूप -
 विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना वाढीस लावणे
 विद्यार्थ्यांना तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे
 प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांसमवेत संवादाची संधी
 उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे

Web Title: Pune University Institution Innovation Council