पुणे विद्यापीठाचा पेपर पुन्हा फुटला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पेपरफुटीचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) शाखेच्या तृतीय वर्षातील ऑबजेक्‍ट ऑरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विषयाचा पेपर शनिवारी फुटला. सत्र परीक्षेतील पेपरफुटीचा आजचा हा सलग तिसरा दिवस होता. द्वितीय आणि तृतीय वर्षातील सत्र परीक्षेचे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधीच ते व्हॉटस्‌ॲपवर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. 

या आठवड्यात इंटरनेट प्रोग्रॅमिंग, प्रोग्रॅमिंग इन जावा आणि ऑबजेक्‍ट ऑरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पेपर फुटल्याचे दिसून आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा ते पाऊण तास आधी हे पेपर व्हॉटस्‌ॲपवर यायचे आणि ते व्हायरल व्हायचे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. पेपर मोबाईलमध्ये मिळाल्यानंतर परीक्षेच्या उरलेल्या वेळेत विद्यार्थी ठराविक प्रश्‍नांच्या उत्तरांची घोकंपट्टी करायचे आणि वर्गात उशिरा येत होते, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे.

‘विद्यापीठाकडे तक्रार नाही’
विद्यापीठाचा कोणताही पेपर फुटलेला नाही. विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाला प्रश्‍नपत्रिका पाठवून दिली जाते. ही प्रश्‍नपत्रिका महाविद्यालयाकडून डाउनलोड केली जाते. ती वेळ आणि संबंधित महाविद्यालयाला कोड वॉटरमार्क म्हणून प्रश्‍नपत्रिकेवर उमटतो, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने दिली आहे.

Web Title: Pune University Paper leakage