राज्य संस्कृत-नाट्य स्पर्धेत पुणे विद्यापीठ द्वितीय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

पुणे :  नागपूर येथे  2 मार्च ते 7 मार्च दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय 58 व्या संस्कृत नाट्य स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवत रौप्य पदक पटकावले

पुणे :  नागपूर येथे  2 मार्च ते 7 मार्च दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय 58 व्या संस्कृत नाट्य स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवत रौप्य पदक पटकावले. 

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित संस्कृत नाट्य स्पर्धेमध्ये संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने 'अनुबंध: ' हे नाटक सादर केले होते. पूर्वा पालेकर व राधिका देशपांडे यांनी कै. विजय तेंडुलकर लिखित 'शांतता कोर्ट चालू आहे' या सुप्रसिद्ध नाटकाचा संस्कृत भाषा अनुवाद केला होता. द्वितीय सांघिक पारितोषिकासह या स्पर्धेत विभागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय पारितोषिक सुधर्म दामले, उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक साध्वी मराठे, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र चिन्मय पुजारी यांना मिळाले. 

विभागप्रमुख डॉ. शैलजा कात्रे, प्रा. डॉ. राजश्री मोहाडीकर, प्रा. डॉ. दिनेश रसाळ, प्रा. मुग्धा गाडगीळ व  निधी वडेर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले तर विद्यार्थ्यांनी विजयी संघाचे जल्लोषात स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University rank second in State Sanskrit-Natya Competition