सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ दहाव्या क्रमवारीत घसरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची २०१९ सालची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) जाहीर झाली असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या दहामध्ये स्थान कायम ठेवले आहे.

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग (नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क-एनआयआरएफ) जाहीर झाले असून त्यात सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग तिसऱ्यावर्षी पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. गेल्यावर्षी नवव्या स्थानावर असणारे पुणे विद्यापीठ यंदा देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे "एनआयआरएफ' रॅंकिंग जाहीर करण्यात आले. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या "टॉप शंभर' संस्थांमध्ये पुणे विद्यापीठ 17 व्या स्थानावर असून महाराष्ट्रातील 12 शिक्षण संस्था असून त्यात पुण्यातील सहा संस्थांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ही नामांकने दिली जातात. क्रमवारी ठरविताना विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र व कायदा असे एकंदर नऊ गट निश्चित करण्यात आले होते. त्यांचा दर्जा ठरवण्यासाठी विविध निकष ठरवण्यात आले होते. विद्यापीठांच्या गटात सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाने ५८.४० गुणांसह दहावे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठाला ५८.२४ इतके गुण होते. सर्व संस्थांच्या गटामध्ये (ओव्हर ऑल) या विद्यापीठाने १७ वे स्थान मिळवले आहे.

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठाची पावले योग्य दिशेने पडत असल्याची ही पावती आहे. सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व अधिकार मंडळांच्या कार्याचे हे सामूहिक यश आहे.”
-  डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

“जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या गुणवत्तेच्या स्पर्धेत विद्यापीठाने विविध आघाड्यांवर केलेल्या भरीव कामगिरीमुळे हे यश प्राप्त झाले आहे. शिक्षणाच्या दर्जाबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आलेख आणखी उंचावलेला आहे.”
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू

"नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क 2019'चे वैशिष्ट्य : 
- देशात "आयआयटी मद्रास'ने मिळविला पहिला क्रमांक (ओव्हरऑल गट) 
- "टॉप 100' क्रमवारी महाराष्ट्रातील 12 शिक्षण संस्था 
- पुण्यातील पाच संस्थांचा "टॉप 100'मध्ये समावेश 

"टॉप 100'मध्ये असणाऱ्या संस्था (राज्यातील संस्था) 
शिक्षण संस्था : क्रमवारी 
- महाराष्ट्रातील आयआयटी मुंबई : चौथ्या स्थानावर 
- "टॉप 100' मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : 17 व्या स्थानावर; तर विद्यापीठांच्या क्रमवारीत : 10 स्थानावर 
- पुण्यातील आयसर : 23व्या स्थानावर 
- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (मुंबई) : 27 व्या स्थानावर 
- होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई : 30व्या स्थानावर 
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई : 56 व्या स्थानावर 
- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे : 70 व्या स्थानावर 
- पुण्यातील सिंबायोसिस इंटरनॅशनल : 82 व्या स्थानावर 
- नरसी मॉंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई : 83 व्या स्थानावर 
- भारती विद्यापीठ, पुणे : 88 व्या स्थानावर 
- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे : 91 व्या स्थानावर 
- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा : 92 व्या स्थानावर 

देशातील पहिल्या दहा विद्यापीठांची क्रमवारी : (एक ते दहा क्रमाने) 
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर 
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली 
- बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी 
- युनिर्व्हसिटी ऑफ हैदराबाद 
- कोलकता विद्यापीठ, कोलकत्ता 
- जादवपूर विद्यापीठ, कोलकत्ता 
- अण्णा विद्यापीठ, चेन्नई 
- अमरिता विश्‍व विद्यापीठम्‌, कोईम्बतूर 
- मणिपाल ऍकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल 
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 

अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण संस्थांची क्रमवारी : (पहिले दहा क्रमवारी) 
-
आयआयटी, मद्रास 
- आयआयटी, दिल्ली 
- आयआयटी, मुंबई 
- आयआयटी, खरगपूर 
- आयआयटी, रुरकी 
- आयआयटी, गुवाहाटी 
- आयआयटी, हैदराबाद 
- अण्णा युनिर्व्हसिटी, चेन्नई 
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, तिरुचिरापल्ली

Web Title: Pune University rank in top 10 list of the best universities in the country