पुणे विद्यापीठात उभारणार सायनोलॅब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक आणि उद्योजिकांसाठी ‘सायनोलॅब’ची उभारण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि संकल्पना मांडण्यासाठी आणि राबविण्यासाठी ही लॅब असेल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक आणि उद्योजिकांसाठी ‘सायनोलॅब’ची उभारण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि संकल्पना मांडण्यासाठी आणि राबविण्यासाठी ही लॅब असेल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.

समाजामधील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजनांच्या संकल्पना मांडण्यासाठी ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याद्वारे विचार आणि संकल्पनांचे आदान-प्रदान करण्यास वाव मिळणार आहे. सोशल इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशिप हे दोन घटक केंद्रस्थानी ठेवून नव्या व्यावसायिक संकल्पना मांडण्यासाठी सायनोलॅब हे व्यासपीठ ठरणार आहे. युरोपियन युनियनने सोशल इनोव्हेशन फॉर लोकल इंडियन ॲण्ड इस्त्रायली कम्युनिटीज ॲण्ड ग्रॅज्युएट आंत्रप्रेन्युअर्स (सिलिस) या प्रकल्पांतर्गत 

सोशल इनोव्हेशनसंदर्भातील संकल्पना मांडण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. जागतिक स्तरावरील या प्रकल्पासाठी युरोपियन युनियनने १० लाख युरो निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशातील इतर चार संस्थांना सिलिस लॅब उभारण्यासाठी निधी मिळणार आहे. देशासह इस्राईलमधील पाच संस्थांचा यात समावेश आहे. 

विद्यापीठाच्या इंटरनॅशनल सेंटर विभागात येत्या बुधवारी (ता.१८) आंत्रप्रेन्युअरशिप विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाच्या कॉन्स्टंझ गेरहार्डस यांचे बिझनेस कॉन्टॅक्‍टस अँड नॉलेज ट्रान्सफर विषयावर व्याख्यान होईल. मेक्‍सिकोतील बूट कॅम्प आयडिया लॅब फॉर आंत्रेप्रेन्युअरशिपचे फर्नांडा गामेझ आणि मॅक्‍स प्लॅसेंसिया हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

वैशिष्ट्ये
    समाजातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या उपाययोजना, संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ 
    त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न होतील.
    सामाजिक उपक्रम आणि उद्योजकता हे केंद्रस्थानी ठेवून व्यावसायिक संकल्पना मांडता येतील
    विचार आणि संकल्पनांचे आदान-प्रदान होईल

सौरऊर्जा आणि इतर पर्यायी ऊर्जा संसाधने, स्वच्छ भारत मोहीम, सांडपाणी आणि मैलापाणी व्यवस्थापनातील मानवी हस्तक्षेप वगळण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध, ही या लॅबची प्रमुख उद्दिष्टे अाहेत. अन्य नावीन्यपूर्ण संकल्पना शोधण्यासाठी विविध स्टार्ट अप्स्‌बरोबर काम करण्याची केंद्राची तयारी आहे.
- डॉ. विजय खरे, विभाग प्रमुख, इंटरनॅशनल सेंटर

Web Title: pune university sinolab