पुणे विद्यापीठाकडून परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास सुरूवात

uni.jpg
uni.jpg

पुणे : अंतीम वर्षाच्या परीक्षांचा घोळ अद्याप संपलेला नसला तरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम, द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर करण्यास सुरूवात केल्याने पुढील वर्षात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 'कोरोना' मुळे पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा अर्धवट राहिल्या होत्या. त्यांच्या परीक्षा पुन्हा घेता येणार नसल्याने अंतीम वर्ष वगळता इतर वर्षांचे निकाल अंतर्गत मूल्यांकन व गत वर्षीच्या किंवा सत्राच्या गुणांवरून सरासरी गुण देऊन लावण्याचा निर्णय यूजीसी तसेच राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार पुणे विद्यापीठाने या निकालाची प्रक्रिया सुरू केली होती.  पुणे विद्यापीठाने यासाठी महाविद्यालयांना अंतर्गत अाॅनलाईन भरण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर गणितीय पद्धतीने सरासरी काढून गुणदान करून सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून जर्नलिझम, अभियांत्रिकी प्रथम व द्वितीय वर्ष, एमएससी (सर्व शाखा) प्रथम वर्ष, एमसीए, एमसीएस, एमसीए यासह २० ते २२ अभ्यासक्रमाचे निकाल आॅनलाईन जाहीर झाले अाहेत, तसेच महाविद्यालयांकडेही ते पाठवून देण्यात आले आहेत.  

पुणे विद्यापीठाने अंतीम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांचे निकाल लावण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत २० ते २२ निकाल लागले आहेत. जुलै अखेर पर्यंत सर्व निकाल जाहीर होतील."
डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

अचुक निकालासाठी समिती
अशा प्रकारे निकाल लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमातील तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने निकाल तपासल्या नंतर ते जाहीर करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com