पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थांचा भरतोय 'व्हॉट्सअॅपवर' क्लास

Pune University students attending WhatsApp class
Pune University students attending WhatsApp class

पुणे : 'कोरोना'मुळे वर्ग बंद झाले असले तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांचे रोज व्हॉट्स अॅप क्लास भरत आहेत. विद्यार्थी प्रश्न विचारत असून, प्राध्यापकांकडून शंकांचे निरसन करत आहेत, तसेच स्वतः नोट्स लिहून विद्यार्थांना शेअर करत आहेत. या 'व्हॉट्स अॅप' क्लास मुळे विद्यार्थांच्या अभ्यासातील सातत्य कायम आहे

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद झाल्यानंतर शासनाने विद्यार्थांना वसतीगृहही सोडण्याचे आदेश दिले होते. काहींचे शेवटचे काही धडे शिकविण्याचे शिल्लक होते, त्यामुळे हा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार असा प्रश्न विद्यार्थी, प्राध्यापकांना पडला होता. 
पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांना 'वर्क फ्राॅम होम'चे आदेश दिले, त्यामध्ये संशोधन प्रकल्पाचे लिखाण, नोट्स काढणे, संदर्भ संग्रहीत करणे अशी कामे केली जात आहेत. विद्यार्थी घरी असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठातील विभागांना पदव्युत्तरच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांचे व प्राध्यापक यांचे स्वतंत्र व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले आहेत. त्यात रोज एका विषयाचे धडे प्राध्यापक शेअर करत आहेत, ते वाचून विद्यार्थी त्यांच्या शंका विचारतात, त्यावर प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जात आहे. राहिलेला अभ्यासक्रम ही पूर्ण करत आहेत. रोज किमान २ ते ३ तास व्हॉट्स अॅपवर  प्राध्यापक  व विद्यार्थी यांच्यात संवाद होत आहे.
 
Corona Case Study : मुंबईत NRI नागरिक राहतोय भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमध्ये..
गणित विभागातील प्राध्यापक सचिन बल्लाळ म्हणाले, "परीक्षेसाठी विद्यार्थांची तयारी सुरू आहे, त्यांच्या शंका निरसन करण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप केला आहे. त्यावर नोट्स शेअर केल्या जातात. काही वेळा मी स्वतः गणित सोडवून ते विद्यार्थांना देतो. रोज किमान दोन तास अशा प्रकारे मार्गदर्शन सुरू आहे."

Corona Case Study : मुंबईत NRI नागरिक राहतोय भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमध्ये..
जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डाॅ. राजेंद्र गच्चे म्हणाले, "विद्यार्थांना ईमेल द्वारे नोट्स पाठविल्या जात आहेत, त्यांना ज्या काही अडचणी येतात, त्याबद्दल ते व्हॉट्स अॅप ग्रुपवर प्रश्न विचारतात. त्यानंतर पुन्हा सर्व विषय समजावून सांगितला जातो. विद्यापीठाला सुट्टी लागताना विद्यार्थांना आवश्यक पुस्तके दिले आहेत. त्यांना आणखी जास्त  संदर्भ हवा असेल तर आॅनलाईन उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती शेअर केली जाते. आॅनलाईन शिकविण्याचा हा प्रयोग विद्यार्थी व प्राध्यापक यांना लाभदायक ठरत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रॅक्टीकलची अडचण
लाॅकडाऊनच्या काळात विज्ञान शाखेचे थेअरीचे क्लास आॅनलाईन होत असेल तरी घरातून कोणालाही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे थेअरी शिकली तरी विद्यार्थांना प्रॅक्टीकल करता येत नसल्याने काही प्रमाणात अडचण निर्माण होत आहे.

Coronavirus : निजामुद्दीनहून आलेले पिंपरी-चिंचवडमधील 14 जण रुग्णालयात दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com