पुणे विद्यापीठाचा इंजिनियरिंग मॅकेनिक्सचा पेपर फुटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर सकाळी दहा ते बारा यावेळेत होता. विद्यापीठाकडून तो कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयास सकाळी 9.40 ला पाठविला. त्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास तो व्हायरल झाला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इंजिनियरिंग मॅकेनिक्स हा पेपर आज फुटला. विद्यापीठाने त्याची चौकशी सुरू केली आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर सकाळी दहा ते बारा यावेळेत होता. विद्यापीठाकडून तो कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयास सकाळी 9.40 ला पाठविला. त्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास तो व्हायरल झाला. याला विद्यापीठाने दुजोरा दिला आहे. आधी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होती.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, "कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक पाठविले आहे. चौकशीनंतर कुलगुरुंच्या आदेशाने पुढील कारवाई केली जाईल. माझ्यापर्यंत हा पेपर साडेअकरानंतर आला आहे. कदाचित एखाद्या मुलाने परीक्षा केंद्रातून लवकर बाहेर पडून तो व्हायरल केला असावा, अशी शक्यता आहे."

Web Title: Pune University's engineering mechanics paper leak