पुणे विद्यापीठाच्या निकालाचे सुत्र जाहीर; कसा लागणार निकाल वाचा सविस्तर

uni.jpg
uni.jpg

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर पदवीचा अंतीम वर्ष वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी सुत्र निश्‍चीत केले आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यमापनावर 50 टक्के आणि पूूर्वीच्या सत्र/ वर्षातील गुणांवर 50 टक्के क्षेणी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास व इतर कामगिरीवरच निकालाची टक्केवारी अवलंबून आहे.

कोरोनामुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. त्यामुळे निकाल कसा लावावा हे ठरविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कुलगुरूंची समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकारने अंतीम वर्ष वगळात इतर वर्षांची परीक्षा रद्द केली. ज्यांची परीक्षा रद्द झाली आहे, त्यांना पूर्वीचे गुण व अंतर्गत मूल्यमापनावर निकाल लावला जाईल असे स्पष्ट केले होते.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने याबाबत परिपरत्रक काढले असून, यामध्ये गणितीय सूत्र पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निश्‍चित केले आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळता अन्य विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी 50 टक्‍के अंतर्गत मूल्यामापन व 50 टक्‍के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण असे सूत्र क्षेणी देण्यासाठी ठरविण्यात आले. या सूत्रास विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांनी मान्यता दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, त्यानुसार विद्यापीठाच्या प्रथम ते अंतिमपूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

त्याचप्रमाणे महाविद्यालय स्तरावरील परीक्षा तसेच स्वायत्त व संलग्न महाविद्यालयाच्या परीक्षांच्या निकालासाठी अधिकार मंडळाने मान्यता दिलेल्या गणितीय सूत्रांचा वापर करण्यात यावा. विद्यापीठाने तयार केलेले गणितीय सूत्राचा तपशील प्रसिद्ध करण्यात आल्याने महेश काकडे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com