कात्रज सिलिंडर स्फोटप्रकरणी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

एकाला अटक; विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस रिफीलिंगमुळे ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले
Katraj cylinder blast
Katraj cylinder blastSakal

पुणे : कात्रज परिसरात मंगळवारी (ता.२९) झालेल्या सिलिंडर स्फोटप्रकरणी पोलिसांनी चारजणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस रिफीलिंगमुळे ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींनी संगनमतीने विनापरवाना सिलिंडचा साठा करून त्यासाठी रिफीलिंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर संदीप पाटील ( वय २६), सोनू मांगडे, संपत सावंत आणि दत्तात्रेय काळे (सर्व रा. कात्रज) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील पाटील याला अटक करण्यात आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिल अंमलदार गणेश काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रेय काळे हा जागामालक असून तेथे पाटील याने गॅस रिफिलिंगचा बेकायदा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी त्याने तेथे १०० हुन अधिक सिलिंडर्स आणून ठेवले होते. तेथे मोठ्या सिलिंडर्समधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचे काम सुरू असतानाच वायू गळती झाली.

त्यामुळे आग लागून एकापाठोपाठ सुमारे २५ सिलिंडर्सचे स्फोट झाले. तसेच गॅसचा स्फोट झाल्यानंतर गॅसच्या टाक्या आजूबाजूच्या घरांवर पडून काचांचे नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे संपूर्ण कात्रज परिसर हादरला होता. आगीत संपूर्ण गोडाऊन भस्मसात झाले आहे. तसेच तेथील दोन चारचाकी वाहनेही खाक झाली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com