पुण्यात ‘वंसतोत्सव’ रंगणार; कधीपासून ते पहा

vasantotsav
vasantotsav

पुणे - पुण्याचा सांस्कृतिक मानबिंदूंपैकी एक समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वरांच्या या उत्सवाचे हे सलग चौदावे वर्ष असून, हा महोत्सव १९ ते २१ फेब्रुवारी या दरम्यान दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून यंदा हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवात ध्रुपद, शास्त्रीय गायन, तालवाद्य, दाक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीताचा मेळ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेता येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. यावेळी आयोजन समिती सदस्य राजस उपाध्ये उपस्थित होते. 

महोत्सवाची सुरवात शुक्रवारी (ता. १९) पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायनाने होईल. नंतर ज्येष्ठ धृपद गायक पं. उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोपात शुजात हुसेन खान (सतार), मुकेश जाधव (तबला), रणजित बारोट (तालवाद्य) व सहकलाकार यांचा कलाविष्कार सादर होणार आहे. 

दुसऱ्या दिवशी (ता. २०) सतार वादक शाकीर खान यांचे वादन होईल. नंतर शास्त्रीय गायक विजय कोपरकर यांचे गायन होईल. हिंदुस्तानी व दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताचा मेळ साधत प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया व वेणू बासरीचे मास्टर शशांक सुब्रमण्यम यांचे एकत्रित बासरी वादन होणार आहे. यावेळी पं. विजय घाटे हे तबल्याची साथ करतील. या दिवसाचा समारोप आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे.

समारोपाच्या दिवशी (ता. २१) ज्येष्ठ तबला वादक पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव व ईशान घोष यांच्या एकत्रित तबला वादनाने सुरुवात होईल. नंतर पंकज उधास यांचा  गझल गायनाचा कार्यक्रम होईल. महोत्सवाचा राहुल देशपांडे यांच्या गायनाने होणार असून यावेळी त्यांच्या साथीला सारंगीवादक मुराद अली असतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com