esakal | पुण्यातील दुकानांबाहेरील वर्तुळ गायब; नियमांसाठी महापालिकेने पुन्हा कसली कंबर

बोलून बातमी शोधा

Pune

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी दुकानाबाहेर वर्तुळ करून तेथे ग्राहकांना थांबवले जात होते.

पुण्यातील दुकानांबाहेरील वर्तुळ गायब; नियमांसाठी महापालिकेने पुन्हा कसली कंबर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी दुकानाबाहेर वर्तुळ करून तेथे ग्राहकांना थांबवले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून हे वर्तुळ गायब झाले असून शिस्ती शिस्तीचेही पालन होत नाही. शहरात आता केवळ किराणा व इतर अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू रहाणार असल्याने तेथे या नियमांचे पालन केले जावे यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक  झाल्याने महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये किराणा दुकाने, भाजी विक्री, औषध दुकाने, दुध , बेकरी दुकाने उघडी राहणार आहेत, उर्वरीत सर्व बाजारपेठ ३० एप्रिल पर्यंत बंद असेल असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण लाॅकडाऊन लावण्यात आलेला होता, तेव्हा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू होती. 

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका
किराणा दुकाने, भाजी दुकाने यासह इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अवघड झाले होते. त्यावेळी पुण्यातील दुकानदारांनी दुकानाबाहेर तीन फुटाच्या अंतरावर वर्तुळ किंवा चौकण काढून त्यामध्ये ग्राहकांना थांबविण्याची सक्ती केली. नागरिकांनीही या नियमांचे पालन केले. तसेच दुकानांमध्ये ग्राहकांना प्रवेश नसल्याने कामगारांनी धोका नव्हता. अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत या नियमांचे पालन करण्यात आले त्यानंतर हळूहळू स्थिती पुर्ववत होऊन नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता शहरात पुन्हा कोरोनाच्या साथीने थैमान घातलेले असताना अजून ही दुकानांबाहेरील शिस्तीचा ग्राहक व दुकानदारांना विसर पडला आहे. 

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, "अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये शिस्तीचे पालन होणे गरजेचे आहे. दुकानांमध्ये गर्दी होणार असेल तर दुकाने बंद केले जातील. त्यामुळे व्यापार्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच मास्क, सॅनिटाइजर नागरिकांनी वापरावे. 

"अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असली तरी ग्राहक मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे आताही होम डिलिव्हरी देण्याची, ग्राहकांकडून सामानाची यादी देऊन त्यांना वेळ देऊन बोलावून घेणे अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ