Pune : विघ्नहर कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्काराने गौरव

राष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्गीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्गीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्गीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार sakal

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्काराने वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवार ता.२१ रोजी गौरविण्यात आले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने हंगाम २०२१- २२ च्या हंगामातील मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा राज्यस्तरीय पुरस्कार तसेच नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज नवी दिल्लीचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसर्‍या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्गीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले व संचालक मंडळाने पुरस्काराचा स्वीकार केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री व दिलीप वळसे पाटीला तसेच साखर उद्योगातील प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले, कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची  मुहुर्तमेढ रोवली. कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून श्री विघ्नहर यापुर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी मिळालेल्या दोन्ही पुरस्कारांमुळे विशेष आनंद होत आहे. या दोन पारितोषिकांमुळे विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शेरकर पुढे म्हणाले , कारखाना गाळप क्षमतेचा पूरेपूर वापर करत आहे. ऊसाची संगणीकृत नोंदणीमुळे ऊस तोडणी नियोजन काटेकोरपणे केले जाते. यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत होत असल्याने उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच एक डोळा पध्दतीने ऊस रोप लावणीवर भर देणे, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करुन नियंत्रणावर विशेष भर देणे, उत्कृष्ठ बायोकंपोस्ट खत निर्मिती करणे,

जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठ्यावर भर देणे, बेणेमळा नियोजनातून उत्कृष्ठ प्रतिचा बेणे पुरवठा करणे, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीतजास्त भर देणे, ठिबक सिंचनासाठी विशेष प्रयत्न करणे, प्रभावीपणे काम करण्याच्या या बाबी विचारात घेवून वसंतदादा इन्स्टिट्युटने हा सर्वोत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धनाचा पुरस्कार कारखान्याला दिला आहे.

श्री विघ्नहर कारखान्यास सत्यशील शेरकर यांचे तरुण व दुरदृष्टी असणारे नेतृत्व लाभल्याने त्यांनी कारखान्याच्या सर्व विभागांत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्याचा परिपाक म्हणून श्री विघ्नहर कारखान्यास अनेक पुरस्कार मिळत असल्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप व कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सांगितले.

सोबत फोटो- मांजरी-पुणे देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसर्‍या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारताना अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com