राजकारणासह इतर क्षेत्रातही संपर्क आवश्यक - अनुराग ठाकूर

पुणे दौऱ्यावर असलेल्या अनुराग ठाकूर यांनी शासकीय विश्रामगृह येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद
pune visit of anurag thakur statement Need contact in other fields besides politics
pune visit of anurag thakur statement Need contact in other fields besides politicssakal

पुणे : राजकारण करताना केवळ राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क ठेवणे पुरेसे नाही. तुमचा जनाधार वाढण्यासाठी इतर क्षेत्रातील व्यक्तींसोबत चांगले संबंध असले पाहिजेत, असे असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. पुणे दौऱ्यावर असलेल्या अनुराग ठाकूर यांनी शासकीय विश्रामगृह येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अर्चना पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, राज्यात भाजपला काम करण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. कोणत्याही पदावर भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याने राजकारण करीत असताना त्याने खेळासारख्या अन्य क्षेत्रात ही काम करावे, ज्यामुळे पक्षाचा पाया व्यापक होऊन जनाधार वाढण्यास मदत होईल. मुळीक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, पांडे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आणि पोटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com