esakal | Pune : मतदारांनी वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करावा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : मतदारांनी वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करावा

Pune : मतदारांनी वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासह मतदार ओळखपत्रात बदल करण्यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून निवडणूक आयोगाच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविला जात आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी एक नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मतदारयादीत नाव नोंदविणे, मतदार ओळखपत्राच्या तपशिलात बदल करता येणार आहे. तसेच, स्थलांतरित किंवा कुटुंबातील मृत सदस्याचे नाव वगळणे आणि इतर ठिकाणी नाव समाविष्ट करणे शक्य होणार आहे.

loading image
go to top