Pune Wall Collapse : रहिवाशांच्या तक्रारीकडे बिल्डरचे दुर्लक्ष

बिल्डरला केलेल्या ईमेलची प्रत.
बिल्डरला केलेल्या ईमेलची प्रत.

पुणे - कोंढव्यात सीमाभिंत अंगावर कोसळून चार चिमुकल्यांसह पंधरा जणांचा बळी जाण्यामागे बिल्डरचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. सीमाभिंत खचली असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी बिल्डरकडे चार महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, त्याकडे बिल्डरने दुर्लक्ष केले. दुर्घटनाग्रस्त अल्कॉन स्टायलस सोसायटीत अडीच वर्षांपासून सदनिकाधारक राहण्यासाठी आले असले, तरी अद्याप ड्रेनेज लाइन, पाणी, गॅस लाइन, सुरक्षारक्षक, जनरेटर, सीसीटीव्ही, पार्किंग यांसह अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची सोसायटी स्थापन झाली नसून, सर्व व्यवस्थापन बिल्डरकडूनच केले जात आहे. 

रखडलेल्या कामांबाबत बिल्डरकडे अनेकदा तक्रारी करूनही काहीच होत नसल्याने रहिवाशांनी १८ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता बिल्डरला ई-मेल पाठवून त्यात ३० मुद्दे मांडले होते. त्यामध्ये १८वा मुद्दा हा धोकादायक सीमाभिंतीबाबत असून, त्यात सीमाभिंतीचा दर्जा निकृष्ट आहे, पंपहाऊस जवळील पार्किंगची जागा खचली आहे. त्याकडे लक्ष द्यावे, असे या ई-मेलमध्ये म्हटले होते. 

दरम्यान, सोसायटीतील समस्यांबाबत रहिवासी आणि बिल्डर यांच्यामध्ये संवाद सुरू होता. पालिकेकडे याबाबत तक्रार आलेली नाही. असे पालिकेचे  शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com