पुणे : वनाज कंपनीजवळ फुटली जलवाहिनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पौडरस्ता (पुणे) : पौडरस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रोचे खोदकाम चालू असताना अठरा इंची जलवाहीनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहत वाया गेले. पौडरस्त्यावर वनाज कंपनी ते किनारा चौक या परिसरात पुरसदृष्यस्थिती तयार झाले होती.

पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी भांगरे एस. एम. यांनी सांगितले की, ''मेट्रोच्या पोकलॅनमुळे जलवाहिनीची कॅप निघाली. त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. पाणी जाण्याच्या वेळात ही घटना घडल्यामुळे कोथरुडकरांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही. उद्या नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा होईल.''

मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांना विचारले असता, '' सदर घटने बाबत माहिती घेत आहे'' , असे सांगितले. घटनेचे प्रत्यक्षदर्शी पंकज खोपडे म्हणाले की, ''पाण्याचा प्रवाह इतका होता की, काही दुचाकी घसरुन पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु हजारो लिटर पाणी वाया गेल्याचे दुःख वाटते. मेट्रोने काम करताना पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.'' 

Web Title: Pune: water pipeline was broken near Wanaaj Company due to metro work