पुणे: ‘मुळशी’तील पाण्याचा प्रस्ताव राज्याच्या कोर्टात

महापालिकेकडून मंजुरी; पाच टीएमसी पाण्याची गरज
पुणे: ‘मुळशी’तील पाण्याचा प्रस्ताव राज्याच्या कोर्टात
sakal

पुणे : महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ आणि २३ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. महापालिका हद्दीत नव्याने ११ आणि २३ गावांचा समावेश झाल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.

पुणे: ‘मुळशी’तील पाण्याचा प्रस्ताव राज्याच्या कोर्टात
कामगार संघटनांचा देशव्यापी बंदला पाठिंबा

वाढीव पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुळशी धरणातून पाणी घेण्याचा पर्याय भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या उद्‍घाटन कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यानुसार बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ११ आणि २३ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाला प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी देण्यात आली.

या वेळी बोलताना काँग्रेस गटनेते आबा बागूल म्हणाले, ‘शहराला मुळसी धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उचलून धरली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’ नगरसेवक प्रशांत जगताप म्हणाले, ‘हा प्रस्ताव राज्य‌ शासनाकडून मंजूर होणार आहे. मुळशी धरणाचे पाणी शहराला मिळण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवा, अशा‌ सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच दिल्या आहेत. पुणेकरांच्या वतीने अजित पवार यांचे मी धन्यवाद मानतो.’

"पालकमंत्री म्हणून अजित पवार कायमच चोख भूमिका बजावतात, यात कोणतेही दुमत नाही. आज आपण सभागृहात प्रस्ताव मंजुर करत आहोत, यानंतर आपण सर्वांनी मिळून शासनाकडे पाठपुरावा केला,‌ तर या धरणातून आपणास पाणी मिळेल. देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार या‌ दोघांनीही नेहमीच पुण्याला झुकते माप दिले आहे."- गणेश बिडकर, सभागृह नेते, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com