पुणे : पाणी पुरवठ्यातून सव्वाशे कोटीचे उत्पन्न

पाणी पुरवठा विभागाने केलेल्या प्रयत्नातून १२१.६८ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले
pune water supply department Income of Rs 1 crore Ravindra Binwade and  Aniruddha Pawaskar
pune water supply department Income of Rs 1 crore Ravindra Binwade and Aniruddha Pawaskarsakal

पुणे : पाणीपुरवठा विभागाला तसा महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पाहिले जात नाही. पण वर्षानुवर्षे मिटरचे घोळ त्यातून वाढत जाणारी थकबाकी यामुळे हा आकडा फुगत आहे. त्यामुळे गेल्यावर्षभरात पाणी पुरवठा विभागाने केलेल्या प्रयत्नातून १२१.६८ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. यासाठी गेले वर्षभर काम करणाऱ्या मीटर वाचक व इतर कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व विभागप्रमुख अनिरूद्ध पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महापालिकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ६ हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून नवा विक्रम केला आहे. यामध्ये बांधकाम परवानाचे २००२ कोटी, मिळकतकर विभागाचे १८५० कोटी, जीएसटीचे १८४५ कोटी, मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि मालमत्ता विभागाच्या उत्पन्नाचे असे सुमारे २०० कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. पण यात आता यात पाणी पुरवठा विभागाच्या १२१.६८ कोटी रुपयांची भर पडल्याने यंदाचे उत्पन्न ६२०० कोटी पर्यंत जाणार आहे.

गेल्यावर्षी पाणीपुरवठा विभागाने ९२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. पण यंदा थकबाकी वसूल करण्यासाठ केलेल्या प्रयत्नामुळे १२१ कोटीचा टप्पा ओलांडला आहे, पुढील वर्षी यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com