''पुण्यातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश'' : अजित पवार

5beb80d82962f.jpg
5beb80d82962f.jpg

पुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे  पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळेच हा प्रसंग निर्माण झाला आहे.'',असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला ‌.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराचा पाणीपुरवठा 1350 एमएलडीवरून 650 एमएलडीवर आणला आहे. त्यामुळे पुणे शहराला सध्याच्या तुलनेत निम्मेच पाणी मिळणार आहे. यासंदर्भात पवार म्हणाले, ''जलसंपदा विभाग आणि महापालिका यांनी धरणे भरल्यापासूनच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. तहान लागल्यावर विहीर खोदायच्या नसतात. पालकमंत्री, या सरकारने पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित होते.
धरणातील पाणीसाठा, बाष्पीभवन, जुलैपर्यंत पाणी कसे पुरेल याचे नियोजन करणे अपेक्षित होते. नागरिकांनी पाण्याची काटकसर करणे आवश्यक आहे. असे असले तरी नागरिकांना जेवढे पाणी लागेल एवढे देणे क्रमप्राप्त आहे आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणामुळे शहरावर पाण्याचे संकट ओढवले.'' असा आरोप पवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com