'फेम इंडिया' अंतर्गत पुण्याला मिळणार 150 ई- बसेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

- पुणे शहरासाठी 150 ई- बस आज मंजूर.

- देशातील 64 शहरांना मिळणार 5595 बसेस.

पुणे : केंद्र सरकारच्या अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाकडून पुणे शहरासाठी 150 ई- बस आज (गुरुवार) मंजूर करण्यात आल्या आहेत. देशातील 64 शहरांना 5595 बसेस मिळणार आहेत.

पुणे शहराला मिळणाऱ्या प्रत्येक बस पाठीमागे केंद्र सरकार 55 लाख रुपयांचे अनुदान देणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली.

तसेच 'फेम इंडिया स्किम' अंतर्गत या बसेस पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना मिळणार असून, पीएमपीमार्फत त्यांचे संचालन होणार आहे. चार्जिंग स्टेशनसह या बस मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune will get 150 E buses under Fame India Project