
पुण्याच्या नव्या महापौरांची निवड येत्या 26 नोवंहेंबरला होणार आहे.
पुणे : राज्यातील सत्तेचा तिढा कायम असतानाच पुण्याच्या नव्या महापौरांची निवड येत्या 26 नोवंहेंबरला होणार आहे. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, महापौरपदासाठी येत्या बुधवारी (20) अर्ज भरण्याची मुदत आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
महापौरपदाच्या निवडणुकीत महापालिकेत भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार असण्याची चिन्हे आहेत. विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांची मुदत येत्या 21 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असून, त्यानुसार येत्या 26 नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता निवडणूक होईल. त्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
महाशिवआघाडीचा गुंता सुटला?; शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक