मंत्रिमंडळात पुण्याला स्थान मिळणार?

मंत्रिमंडळात पुण्याला स्थान मिळणार?

पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरीतील नऊ आमदारांच्या बळावर राज्यात पुन्हा सत्तारूढ होणाऱ्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये पुण्यातील किती जणांना मंत्रिपदाची संधी मिळणार, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे शहरात मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जायका, रिंगरोड आदी महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू आहेत. मंत्रिमंडळात पुण्याला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्यास या प्रकल्पांची कामे वेगाने मार्गी लागू शकतील. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडून आले असून, सध्या ते क्रमांक दोनचे मंत्री असल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्‍चित समजला जात आहे; तर पर्वतीमधून तीन वेळा व यंदा शहरातून सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांचाही मंत्रिपदावर दावा आहे. विधानसभेच्या सरत्या कार्यकाळात त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हुकला होता. त्याचप्रमाणे यंदा टिळक जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पहिल्यांदाच निवडून आलेल्या मुक्ता टिळक यांनाही त्यानिमित्ताने संधी मिळू शकते, असा अंदाज भाजपच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे. 

मातंग समाजाचे भाजपमधील एकमेव आमदार म्हणून सुनील कांबळे यांचेही नाव मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकते, अशी पक्षात चर्चा आहे. जिल्ह्यातून भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या विस्तारातही जगताप यांचे नाव चर्चेत होते. 

शिवसेनेबरोबर चर्चा
याबाबत भाजपच्या प्रदेश स्तरावरील प्रतिनिधीशी चर्चा केली असता, मंत्रिमंडळात पुणे शहराला निश्‍चित प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे सांगण्यात आले; तसेच मंत्रिमंडळ रचनेबाबत शिवसेनेबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. त्याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर मंत्रिमंडळात पुण्याला नक्की स्थान मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com