पुणे ९.३ अंशावर..!

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पुणे - राज्यातील अनेक भागात थंडी कमी अधिक होत आहे. पुण्यामध्ये रविवारी (ता.२७) सर्वात कमी म्हणजेच ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या चोवीस तासामध्ये राज्यातील प्रमुख शहरापैकी पुण्यामध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

पुण्यानंतर नाशिकमध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्या दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून पहाटे चांगलाच गारवा जाणवत अाहे. नैऋत्यकडील बंगालच्या उपसागराच्या लक्षद्विपच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. येत्या गुरूवारपर्यत (ता.१) राज्यात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुण्याच्या आसपासच्या परिसरात बुधवारपर्यत (ता.३०) ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

रविवार (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.३ (-३), जळगाव १०.० (-३), कोल्हापूर १४.६ (-२), महाबळेश्‍वर १६.० (-२), मालेगाव १२.०(-१), नाशिक ९.८ (-२), सांगली १२.३ (-३), सातारा ११.८ (-३), सोलापूर १२.७ (-४), सांताक्रूझ १६.६(-३), अलिबाग १८.४(-१), रत्नागिरी १८.२ (-३), डहाणू १७.५ (-२), अौरंगाबाद १३.४ (-१), परभणी १२.६ (-३), नांदेड १३.५(-१), अकोला १२.४ (-३), अमरावती १२.८ (-४), बुलडाणा १५.४ (-१), चंद्रपूर १६.०, गोंदिया ११.७(-३), नागपूर १२.५ (-२), वर्धा १४.०(-१), यवतमाळ १२.४(-३)

Web Title: pune witnesses temperature to 9.3 celsius