भयमुक्त वातावरणासाठी महिलांची सायकल रॅली

रमेश मोरे 
सोमवार, 26 मार्च 2018

जुनी सांगवी-  पिंपळे सौदागर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने भयमुक्त वातावरणासाठी महिला सायकल रॅली काढण्यात आली. रस्त्यावरची दहशत, पर्स चोरी, मंगळसूत्र चोरी, चेन चोरी व महिलांची छेडछाड यामुळे रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडण्यास घाबरतात. महिलांमध्ये धाडस, ध्यैर्य व निर्भयता निर्माण करण्याचा या रॅलीमागील उद्देश होता. रात्री १० वाजता महिला सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिसरातील सुमारे २५० महिलांनी यात सहभाग घेतला.

यावेळी पुष्पा संचेती, सायली सुर्वे, मनीषा मचाले, मिथिला डहाके, वैशाली चौधरी यांच्यासह नाना काटे सोशल फाऊंडेशच्या महिलांनी रॅलीचे संचलन केले.

शिवार चौकातून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली, पुढे कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, साई अँबियन्स चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे शिवार चौकात रात्री ११ वाजता रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदवून समाधान व्यक्त केले. आपला परिसर भयमुक्त राहण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे देखील महिलांनी यावेळी सांगितले. 

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना नगरसेविका शीतल काटे म्हणाल्या,धावपळीच्या युगात स्वःताच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास महिलांना वेळ नाही त्याच बरोबर रोजची रस्त्यावरची दहशत,टवाळखोरांचा उपद्रव  त्यामुळे महिला घराबाहेर पडण्यास  घाबरतात. मात्र महिलांनी खंबीरपणे अशा वाईट कृतीचा सामना करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सध्याच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्यामुळे महिलांनी न घाबरता मुक्तपणे वावरले पाहिजे तसेच स्वतःचे आरोग्य, वायू प्रदूषण व रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन नियमित चांगले ठेवण्यासाठी रोज दिवसातील काही तास तरी सायकल वापरण्याची गरज आहे.त्यामुळे आरोग्याबरोबरच पर्यावरण जपण्यास मदत होईल. सुरक्षा सायकल रॅली यशस्वीतेसाठी  नाना काटे सोशल फौंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: pune woman cycle rally for fear free environment