पुणे : सोशल मिडीयावरील मित्राने नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

पुणे : सोशल मिडीयावर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिला. त्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 17 डिसेंबरला हनुमाननगर परीसरात घडली.

पुणे : सोशल मिडीयावर ओळख झालेल्या तरुणाने प्रेमास नकार दिला. त्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 17 डिसेंबरला हनुमाननगर परीसरात घडली.

सेजल विजय पावसे (वय 20, रा. लक्ष्मी सोसायटी, हनुमाननगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजल ही सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान सोशल मिडीयाच्या माध्यमातुन तिची किराणा माल दुकानदाराच्या ऋषी नावाच्या मुलाशी ओळख झाली होती. त्यातून सेजल त्याच्यावर प्रेम करु लागली. तिने त्याला प्रेमाची मागणी घातली. त्यावेळी त्याने सेजलच्या प्रेमास नकार दिला. हा धक्का सहन न झाल्यामुळे सेजलला नैराश्यने ग्रासले.

दरम्यान, 17 डिसेंबरला तरुणीने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Pune: A woman's suicide due to a social media friend denied her love