मिसेस इंडिया स्पर्धेत पुण्यातील महिलांचे यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पिंपरी - नवी दिल्ली येथे झालेल्या "मिसेस इंडिया-शी इज इंडिया' या सौंदर्यवती स्पर्धेत वाकड येथील डॉ. मनीषा सुकाळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तसेच, "मोस्ट ब्यूटीफूल आईज' हा किताबही त्यांना मिळाला. तर, निगडी-प्राधिकरण येथील डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांना "मिसेस ब्यूटीफूल' हा किताब मिळाला. 
उत्तरांचल मधल्या लुबना खान या मिसेस इंडियाच्या मानकरी ठरल्या. तर मुंबईच्या डेलेनाज शर्मा यांचा दुसरा क्रमांक आला. 

डॉ. मनीषा या दंतोपचारतज्ज्ञ आहेत. तर, डॉ. प्रेरणा या आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. या स्पर्धेत देशभरातून, तसेच दुबई, हॉंगकॉंग, न्यूझीलंड, व्हिएतनाम, अमेरिका येथील भारतीय वंशाच्या 45 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. पुण्यात झालेल्या ऑडिशनमध्ये 12 जणिंची निवड झाली. 

"स्पर्धेत मिळालेल्या यशाचे श्रेय हे कुटुंबाला देते. डॉ. संगीता गायकवाड, मनीषा गरुड, दीपाली पाटेकर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेसाठी उपयुक्त ठरले. माझ्यासाठी आता "मिसेस अर्थ', "मिसेस युनिव्हर्स', "मिसेस वर्ल्ड' या स्पर्धांचे दरवाजे उघडले गेले आहेत,'' 
- डॉ. मनीषा सुकाळे

सौंदर्य स्पर्धेतील यशाचे श्रेय आई-वडील, तसेच मार्गदर्शक डॉ. संगीता गायकवाड यांना देत आहे. सौंदर्य हे फक्त बाह्य नसते. तुम्ही जीवनामध्ये जी मूल्ये जपता, त्याचे सौंदर्य चेहऱ्यावर उमटत असते.
- डॉ. प्रेरणा बेरी - कालेकर 

Web Title: Pune women's got success in Miss India competition