Pune Crime : येरवड्यात अल्पवयीन मुलांचा धुडगूस, कोयत्याने वार

अल्पवयीन मुलांनी कोयते आणि बांबूने केलेल्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर रिक्षांची तोडफोड करून परिसरात धुडगूस घालत दहशत माजवली.
Murderer Attack
Murderer AttackSakal
Summary

अल्पवयीन मुलांनी कोयते आणि बांबूने केलेल्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर रिक्षांची तोडफोड करून परिसरात धुडगूस घालत दहशत माजवली.

पुणे - अल्पवयीन मुलांनी कोयते आणि बांबूने केलेल्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर रिक्षांची तोडफोड करून परिसरात धुडगूस घालत दहशत माजवली. येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात शनिवारी (ता. २८) रात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी अब्दुल्ला अमीरउल्ला खान (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने तक्रार दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला आणि इतर मुलांमध्ये सहा महिन्यांपूर्वी फुटबॉल खेळण्यावरून वाद झाला होता.

अब्दुल्ला हा त्याच्या दोन मित्रांसोबत रात्री अकराच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील गल्लीतून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी या अल्पवयीन मुलांनी दुचाकी अडवून अब्दुल्लावर कोयत्याने वार केले. तसेच, त्याचा मित्र महेश मिश्रा याला बांबूने मारहाण केली. त्यानंतर दोन रिक्षांची तोडफोड करून धुडगूस घालत परिसरात दहशत निर्माण केली.

लक्ष्मीनगरमध्ये राडा -

येरवडा परिसरात अन्य एका घटनेत एका टोळक्याने अल्पवयीन मुलावर लोखंडी हत्याराने वार करून जखमी केले. ही घटना शनिवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजता लक्ष्मीनगरमध्ये घडली.

याबाबत १७ वर्षीय मुलाने दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. शरद प्रमोद इंगळे (वय २७) आणि विवेक प्रकाश गवळी (वय २०, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी त्या संशयितांची नावे आहेत. ‘आमच्या गॅंगच्या नादाला लागू नको’, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीच्या पायावर लोखंडी हत्याराने वार करून त्याला जखमी केले. तसेच, रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडून आणि हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com