पुणे : येरवडा पोस्ट चौकाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन

भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम; जेल रस्त्याचेही सुशोभीकरण व सिग्नल बसविणार
Pune Yerawada Post Chowk making improvement Bhumi Pujan of beautification
Pune Yerawada Post Chowk making improvement Bhumi Pujan of beautificationsakal

लोहगाव : भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त येरवडा पोस्ट चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पालिकेचे माजी विरोधीपक्षनेते व दलित चळवळीतील रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिवंगत उद्धवराव वावरे यांच्या पत्नी वर्धाबाई वावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्धवराव वावरे यांनी त्या काळात या चौकाला सम्राट अशोक यांचे नाव देण्याचा ठराव देऊन मान्यता घेतली होती. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालिका प्रशासन, वाहतूक विभाग व स्मार्ट सिटी विभागात पाठपुरावा करून ना हरकत प्रमाणपत्र घेत परवानगी मिळवली आहे.

येरवडा पोस्ट ते मेंटल कॉर्नर दरम्यान असलेल्या जेल रस्त्याचेही सुशोभीकरण करून या चौकात सम्राट अशोक यांचे शिल्प उभारून वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलची व्यवस्था केली जाणार आहे. या चौकानजीक असलेल्या येरवडा कारागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात ऐतिहासिक पुणे करार झाला होता. यावेळी संपूर्ण वावरे कुटुंबीय, रिपब्लिकन पक्षाचे संपर्कप्रमुख अशोक कांबळे, लेखक समीर आगळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com