पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणावर चाकून वार करत लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला धक्का मारुन भांडणे काढणाऱ्या चौघांनी तरुणावर चाकूने वार करत त्याच्याकडील त्याच्याकडील रोख रक्कम, डेबीट कार्ड, लॅपटॉप असा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास एम्प्रेस गार्डनजवळ घडली

पुणे : दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला धक्का मारुन भांडणे काढणाऱ्या चौघांनी तरुणावर चाकूने वार करत त्याच्याकडील त्याच्याकडील रोख रक्कम, डेबीट कार्ड, लॅपटॉप असा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास एम्प्रेस गार्डनजवळ घडली. 

याप्रकरणी अभिषेक मिश्रा (वय 21, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन दुचाकींवरील चार अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी बालेवाडे येथे गेले होते. तेथून ते हडपसरमधील गोंधळेनगर येथे असलेल्या त्यांच्या घरी जात होते. एम्प्रेस गार्डन परिसरातून ते जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेली एक दुचाकी धक्का मारून पुढे निघून गेली. त्यामुळे फिर्यादी यांनी अचानक ब्रेक लावून गाडी थांबविली. त्यावेळी पाठीमागे असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराची धडक त्यांच्या गाडीला बसली. त्यावरुन पाठीमागील दुचाकीस्वाराने नुकसान भरपाई मागण्यास सुरवात केल्याने त्यांच्यात वाद सुरू झाले.

दरम्यान, फिर्यादी यांना धक्का मारुन पुढे गेलेले दुचाकीस्वार पुन्हा माघारी आले. त्यांनीही फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर चौघांनीही त्यांच्या हातावर चाकूने वार केले. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम, डेबीट, क्रेडीट कार्डद्वारे काढलेली रक्कम, मोबाईल, लॅपटॉप असा ऐवज जबरदस्तीने काढून नेला.

Web Title: Pune young boy get beaten and theft at midnight