पुण्यात बेकायदा पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पुणे : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या यूनिट चारच्या पथकाने एका तरुणास अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असा 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

एकनाथ जन्या धनवडे (वय 22, रा. लमाणतांडा, पाषाण) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरामधे एक तरुण बेकायदा शस्त्र बाळगुन फिरत असल्याची खबर पोलिस कर्मचारी साळुंखे व खुनवे यांना मिळाली होती. 

पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पाषाण येथे सापळा रचुन त्यास अटक केली. त्याच्याविरुद्ध खडकी पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune youth arrested for carrying illegal pistol