Pune Crime : लूटमारीस विरोध करणाऱ्या तरुणाचा खून; एकास अटक

चोरट्यांना विरोध करणाऱ्या पादचारी तरुणाचा बांबूने बेदम मारहाण करीत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Murder
Murderesakal
Summary

चोरट्यांना विरोध करणाऱ्या पादचारी तरुणाचा बांबूने बेदम मारहाण करीत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे - चोरट्यांना विरोध करणाऱ्या पादचारी तरुणाचा बांबूने बेदम मारहाण करीत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव नागनाथ चेंडके (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९, रा. काका वस्ती, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. तर शिंदे याचा चौदा वर्षीय अल्पवयीन साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंडके मजुरी करतो. तो धनकवडीतील चैतन्यनगर परिसरातून निघाला होता.

रात्री साडेआठच्या सुमारास त्याला आरोपी शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने चेंडकेला अडवले. त्याला धमकावून पैसे मागितले. चेंडकेने नकार दिल्यानंतर दोघांनी त्याला बांबूने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या चेंडकेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रदीप शिंदे याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com