...अन् कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

पुणे: गोलेगाव (ता. शिरूर) येथील सुहास दादाभाऊ गोगडे या युवकाचा रांजणगाव गणपती येथील एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरून अपघात झाला अन् कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोगडे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक. एका खासगी कंपनीत ते 7 हजार रुपयांवर नोकरी करून संसाराचा गाडा चालवतात. कुटुंबात 55 वर्षांची आई, 4 व 6 वर्षांच्या 2 मुली व पत्नी आहे. घरात ते एकमेव कमावणारे. अपघातात तेच जखमी झाल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. शस्त्रक्रियेसाठी 7 ते 8 लाख रुपयांची आवश्यकता आहे. गोगडे यांचा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी ग्रामस्थ, मित्र व नातेवाईकांनी काही रक्कम गोळा केली. परंतु, 7 ते 8 लाखांचा टप्पा गाठणे अवघड होऊन बसले आहे. या संकटामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आपल्या मदतीमुळे ते नक्कीच उभारी घेऊ शकतील.

आर्थिक मदतीसाठी-
Mr. Suhas Dadabhau Gogade
Account number: 20213937497
IFSC Code: MAHB0000681
Branch: Ranjangaon Ganpati
MICR code: 411014115

अधिक माहितीसाठी संपर्कः
स्वप्निल पडवळ - 9665050087

Web Title: Pune youth need finance for hospital