पुणे : कोरोनाबाधित अंगणवाडी सेविकेला झेडपीतर्फे १ लाखाची मदत!

ZP-Pune
ZP-Pune

पुणे : वेल्हे तालुक्यातील त्या कोरोनाबाधित अंगणवाडी सेविकेस जिल्हा परिषदेच्यावतीने उपचारासाठी तत्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (झेडपी सेस फंड) ही रक्कम उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले.

या अंगणवाडीसेविकेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली होती. त्यात कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, या अंगणवाडी सेविकेने परदेशी प्रवास केलेला नव्हता किंवा अन्य कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्कही आलेला नव्हता. संपर्काविना बाधा झालेला हा जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला होता. त्यानंतर या रूग्णाला काही दिवस कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, या अंगणवाडी सेविकेच्या प्रकृत्तीत आता सुधारणा झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com