esakal | पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील शाळांबाबत घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

oo.jpg

शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी, गृहपाठ पूर्ण करून घेणार.

पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील शाळांबाबत घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता "शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी" हा नवा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार खुद्द शिक्षक गृहभेटी  देऊन विद्यार्थ्यांकडून गृहपाठ पुर्ण करून घेणार आहेत. 

याशिवाय एखाद्या गल्लीत किमान पाच विद्यार्थी उपलब्ध असतील तर, तेथेच ओसरीवर शाळा भरविण्यात येणार आहेत. कोरोनामुळे सध्या जिल्हा परिषद शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. 

यामुळे अभ्यासक्रम पुर्ण करणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच शाळेचा अभ्यास पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना एकाचवेळी आठवडाभराचा  गृहपाठ सध्माविद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना एकावेळी आठवडाभराचा गृहपाठ (होमवर्क) देणे, असा तिहेरी उद्देश या गृहभेटी किंवा ओसरीवरील शाळांच्या मागे ठेवण्यात आला आहे.

कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मार्च महिन्यापासून बंद आहेत. यामुळे मागील शैक्षणिक वर्षाची वार्षिक परीक्षाही घेता आलेली नाही. त्यातच १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र या चालू शैक्षणिक वर्षात केवळ आॅनलाइन शाळा सुरू आहेत. 

परंतु पुणे जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरी भागात अल्पशिक्षित पालकांचे प्रमाण मोठे आहे. शिवाय या भागात सुरळीत इंटरनेट पुरवठा नाही आणि अनेक पालकांकडे आॅनलाइन शिक्षणासाठी उपयुक्त असलेला अॅंड्राॅईड मोबाईल उपलब्ध नाही. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणपद्धतीचा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना फारसा लाभ घेता येत नाही. त्यामुळे हा गृहभेटींचा उपक्रम सुरु करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले. 

आज वेळापत्रक जाहीर होणार

जिल्हा परिषदेने 'शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी' या नव्या उपक्रमाचे नियोजन व  वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये प्रत्येक आठवड्यात करावयाच्या गृहभेटी, ओसरीवरील शाळा, या भेटी व शाळांचा व वेळ, यामध्ये घ्यावयाचा अभ्यासक्रम, गृहपाठ आदींचा समावेश करण्यात आला आहे. हे वेळापत्रक उद्या (ता.२६) जाहीर केले जाणार आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्ह्यात आॅनलाइन शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. पण दुर्गम भागात अल्पशिक्षित पालकांचे प्रमाण मोठे आहे. शिवाय इंटरनेट व अन्य साधनांचा अभाव असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत. या नव्या  उपक्रमाने ही कसर भरून निघेल.- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

loading image
go to top