झेडपीत दोन दिवसीय तांदूळ, डाळ महोत्सव

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या गुरुवारपासून (ता. ९) जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune ZP
Pune ZPSakal
Summary

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या गुरुवारपासून (ता. ९) जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या गुरुवारपासून (ता. ९) जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पुणे व मराठवाड्यातील उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील महिला बचत गट सहभागी होणार आहेत. यामुळे पुणेकरांना अस्सल इंद्रायणी, हातसडीचा आणि सेंद्रिय तांदूळ आणि सेंद्रिय उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर आदी विविध प्रकारच्या सेंद्रिय डाळी खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या संयुक्त विद्यमाने या तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या गुरुवारी (ता.९) आणि शुक्रवारी (ता.१०) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या लष्कर भागातील मुख्यालयात आयोजित करण्यात आला असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने हा दोन दिवशीय महोत्सव आयोजित केला आहे. त्यामुळे पुणेकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन कडू यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com